भौगोलिक माहिती प्रणाली
भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System)
रॉजर टॉमील्सन यांना भौगोलिक माहिती प्रणालीचा जनक म्हणून ओळखले जाते 15 नोव्हेंबर हा दिवस भौगोलिक माहिती प्रणाली दिन म्हणून साजरा केला जातो. भौगोलिक माहिती प्रणालीची सुरुवात साधारणतः 1961 साली कॅनडा येथे वनसंपत्तीचा नकाशा तयार करण्यातून झाली तेव्हापासून भौगोलिक माहिती प्रणाली हे तंत्रज्ञान जगभरात उपयोगात येत आहे मोठ्या प्रमाणावरील सांख्यिकीचे व्यवस्थापन व विश्लेषण करणारे प्रगतशास्त्र म्हणून त्याची वैज्ञानिक जगात गणना होऊ लागली आहे. संगणक शाखातील प्रगती, अंकीय नमुन्यात उपलब्ध होणाऱ्या सांख्यिकीतील बाद सांख्यिकीचे संग्रहण सुदूर संवेदन व सर्वेक्षण भौगोलिक माहिती प्रणाली तंत्राचा विकास सांख्यिकी व्यवस्थापन तंत्रातील प्रगती यामुळे भौगोलिक महिती प्रणाली तंत्रज्ञानाचा दिवसेंदिवस लक्षणीय विकास होत आहे. भौगोलिक माहिती प्रणालीमुळे आपण नकाशावरील दिवसेंदिवस लक्षणीय विकास होत आहे. भौगोलिक माहिती प्रणालीमुळे आपण नकाशावरील कोणत्याही घटकांतील असणारे स्थानिक संबंध तसेच विविध लक्षणे शोधू शकतो. भौगोलिक माहिती प्रणाली मार्फत भौगोलिक माहितीचे विश्लेषण करून योग्य मांडणी व सांख्यिकीचे विश्लेषण करून सूक्ष्म पर्यायांची निवड केली जाते.
No comments:
Post a Comment