जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली (Global positioning System)
जागतिक
स्थाननिश्चिती तंत्राचा विकास 20 व्या
शतकाच्या उत्तरार्धात झाला. जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली हे तंत्र अमेरिकन शास्त्रज्ञांच्या
कल्पनेतून उदयास आले. 1978 मध्ये अमेरिकन संरक्षण खात्याने
उपग्रहाच्या सहाय्याने स्थाननिश्चिती तंत्र यशस्वीरीत्या कार्यरत केले.
क्षेपणास्त्र प्रक्षेपणात अचूकता आणण्यासाठी या तंत्राची निर्मिती झाली. जागतिक
स्थाननिश्चिती प्रणाली संयुक्त राज्य अमेरिकाच्या संरक्षण खात्याच्या मालकीची असून
त्यांचाच नियंत्रणाखाली कार्यरत आहे. भूगोलशास्त्राच्या अध्ययनात पृथ्वीतलावरील
प्राकृतिक व सांस्कृतिक घटकांचा अभ्यास केला जातो हा अभ्यास करीत असताना कोणत्याही
प्रदेशातील ठिकाणाचे स्थान माहित असणे गरजेचे असते. कोणत्याही स्थळाचे स्थान
अक्षांश, रेखांश, समुद्र सपाटीपासूनची
उंची यासंदर्भात सांगितले जाते. जागतिक स्थान निश्चिती प्रणालीच्या आधारे
कोणत्याही स्थळाचे स्थान सहज निश्चित करता येते.
No comments:
Post a Comment