Sunday, April 16, 2023

Human Geography

 मानवी भूगोल



इसवी सन पूर्व सातव्या शतकापासून लिखित स्वरूपात भूगोलाचे अध्ययन केले जात आहे. भूगोल हे एक प्राचीन ज्ञान शाखा असून भूगोलाला सर्व ज्ञान शाखांची जननी असे म्हटले जाते. इ. स. पूर्व ७व्या शतकापासून लिखित स्वरूपात भूगोलाचे अध्ययन केले जात आहे. भूगोल हे एक प्राचीन ज्ञान शाखा असून भूगोलाला सर्व ज्ञान शाखांची जननी असे म्हटले जाते. अगदी १८ व्या शतकापर्यंत भूगोलामध्ये भूपृष्ठरचना हवामान जलाशय मृदा वनस्पती व प्राणी अशा नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जात होता. जर्मन भूगोल तज्ञ फ्रेडरिक रॅटझेल यांनी 1982 मध्ये “मानववंशभूविज्ञान” (Anthropogeography) या ग्रंथामध्ये पहिल्यांदा मानवाच्या अध्ययनाला सुरुवात केली. म्हणून फ्रेडरिक रॅटझेल यांना मानवी भूगोलाचे जनक असे म्हटले जाते. तेव्हापासून भूगोलाची विभागणी प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल अशा प्रमुख दोन शाखांमध्ये केली जाते. मानवी भूगोल ही भूगोलाची महत्त्वाची शाखा मानली जाते. भूगोलाच्या अभ्यासात मानवाला केंद्रस्थानी मानून विविध मानवी क्रिया प्रक्रियांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो.

मानवी भूगोलामध्ये मानव, मानवा भोवतालचे पर्यावरण आणि मानवी क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. मानव आपली बुद्धिमत्ता कला कौशल्य वैज्ञानिक प्रगती व सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारे नैसर्गिक पर्यावरणातील भूरचना, हवामान, जलाशय, मृदा, वनस्पती, प्राणी, खनिजे या घटकांचा वापर करून आपले जीवन विकसित करत असतो. यातूनच शेती, उद्योग, वाहतूक, वसाहती, व्यापार व इतर भौतिक सेवा सुविधांची निर्मिती केली गेली आहे. या सर्वांचा समावेश सांस्कृतिक पर्यावरणात केला जातो. या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय लोकसंख्या शास्त्रीय घटकांचा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो.

No comments:

Post a Comment